चंदीगड : हरियाणाचे सहकारमंत्री डॉ.बनवारीलाल यांनी सांगितले की, आता राज्यातील सहकारी साखर कारखाने साखरेसह गुळाचेही उत्पादन करणार आहेत. रेवाडी जिल्ह्यातील ग्राम राजियाकी मध्ये लोकांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पलवल, कैथल आणि महम च्या सहकारी कारखान्यांमध्ये गुळ आणि साखरेचे उत्पादन नव्या हंगामात सुरु केले जाईल आणि फलदायक परिणामांनंतर, इतर सहकारी साखर कारखानेही गुळ आणि साखरेचे उत्पादन करतील.
विविध विकासात्मक कामांचे उद्घाटन करण्यासाठी इथे आलेले मंत्री डॉ.बनवारीलाल यांनी सांगितले की, शाहाबाद च्या सहकारी साखर कारखान्या मध्ये इथेनॉल च्या उत्पादनासाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी सांगितले की, अलीकडेच हरियाणा सहकारी साखर कारखाना महासंघाद्वारा तयार परिष्कृत साखर ब्रॅन्डचे छोटे छोटे पॅकिंग ही रोहतक च्या सहकारी साखर कारखान्यात बनवण्यात आले आहेत.
मंत्र्यांनी लोकांना विनंती केली की, त्यांनी कोरोनाच्या फैलावापासून वाचण्यासाठी सरकार आणि जिल्हा प्रशासनाद्वारा जाहीर केलेल्या निर्देशाचे पालन करावे. त्यांनी लोकांना सल्ला दिला की, त्यांनी सोशल डिस्टसिंगचे पालन करावे आणि मास्क वापरावा.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.