युपीतील या शेतकऱ्याची कमाल, उसाची उंची २३ फुटांवर, कमाई झाली तिप्पट

उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील बिलारी विभागातील एका शेतकऱ्याने कमाल केली आहे. मोहम्मद मोबिन या शेतकऱ्याने जवळपास २३ फूट लांब उसाचे उत्पादन घेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे. खास टिश्यू कल्चर पद्धतीने घेतलेल्या या ऊस पिकाची पाहणी करण्यासाठी खूप लांबून शेतकरी मोबिन यांच्या शेताला भेट देत आहेत.

या तंत्रामुळे मोबीन यांचे उसाचे उत्पादन दुप्पट झाले आहे. तर त्यांचे उत्पन्न तीन पटीने वाढले आहे. ऊस पिकासोबत त्यांनी कोबी, बटाटा ही पिकेही घेतली आहेत. ऊस पट्ट्यातील पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी मोहम्मद मोबिन यांनी जवळपास २२ ते २३ फूट उंच ऊसाचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांनी ऊस उत्पादनासाठी नव तंत्राचा वापर केला. एक एकर क्षेत्रात साधारणतः ४० ते ५० क्विंटल ऊस उत्पादन होते. मात्र, मोहम्मद यांनी एका एकरात १०० क्विंटल ऊस उत्पादन घेतले आहे. मोबिन यांनी देशभरातील शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे उत्पादन नव तंत्रज्ञानाने करावे असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here