हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : चीनी मंडी
भारतातील साखर निर्यातदार आता मार्च आणि एप्रिल महिन्यात इराणला साखर निर्यात करणार आहेत. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदा इराण भारताकडून साखर खरेदी करणार आहे.
अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यामुळे इराणला त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी झगडावे लागत आहे. या निर्बंधांमुळे इराणला जागतिक अर्थ व्यवस्थेतून बाहेर करण्यात आले आहे. त्यामुळे इराणला त्यांचे तेल विक्री करताना अमेरिकी डॉलरचा चलन म्हणून वापर करता येत नाही. त्यामुळे इराणने भारताला भारतीय रुपयामध्ये व्यवहार करून तेल विक्री करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचवेळी हे भारतीय चलन इराणमध्ये उत्पादन न होणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले जाणार आहे. साखर निर्यातदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीड लाख टन कच्ची साखर इराणला निर्यात करण्याविषयी करार झाला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात ही साखर इराणला पाठवली जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताला तेल विक्री करून मिळालेल्या भारतीय रुपयांनीच साखर आणि इतर खाद्य वस्तू खरेदी केल्या जाणार आहेत. इराणची गव्हर्नमेंट ट्रेडिंग कॉर्पोरेशन (जीटीसी) या कंपनीने साखर खरेदीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापूर्वी इराण ब्राझीलकडून साखर आयात करत होता. इराणमधील साखर उत्पादन त्यांच्या बाजारपेठेची गरज भागवण्यापुरते नाही. त्यामुळे २०१९मध्ये इराण भारतातून जवळपास चार लाख टन साखर आयात करेल, असा अंदाज आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp