आरबीआयकडून सलग आठव्यांदा रेपो दरात बदल नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी अपेक्षेनुसार रेपो दरात कोणतेही बदल केले नाहीत. हे दर विक्रमी निचांकी स्तरावर कायम राहीले आहेत. सलग आठव्यांदा केंद्रीय बँकेने हे दर जैसे थे स्थितीत ठेवले आहेत. यासोबतच कोविड १९च्या दुसऱ्या लाटेनंतर केंद्रीय बँकेने सुधारणांचे संकेत मिळत असताना आपल्या पतधोरणात काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वाखालील यापूर्वी २२ मे २०२० रोजी पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात बदल करण्यात आला होता. केंद्रीय बँकेकडून व्यावसायिक बँकांना आपल्या गरजांसाठी अल्पकाळासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजदराला रेपो दर म्हटले जाते. दास यांनी द्विमासिक आढाव्याची घोषणा करताना सांगितले की, एमपीसीने रेपो दर चार टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुसार रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के इतका राहील.

दास यांनी सांगितले की एमपीसीने एकमताने व्याज दरात बदल न करण्याचा निर्णय घेतला. महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय बँकेने आपले पतधोरण नरमाईच्या स्थितीत ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. आरबीआयने चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी वाढीचा दर ९.५ टक्के राहील असे आपले अनुमान कायम ठेवला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here