नव्या वर्षात, २०२३ च्या पहिल्या दिवशी होणार हे महत्त्वपूर्ण बदल

वर्ष २०२२ आता अखेरच्या टप्प्यात आहे. नव्या २०२३ या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. यासोबतच नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपल्याला काही महत्त्वाचे बदल अनुभवण्यास मिळणार आहेत. हे बदल तुमच्यावर थेट आर्थिक परिणाम करू शकतात. एलपीजी सिलिंडरच्या किमतीपासून बँक लॉकरपर्यंतच्या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
आज तकमधील वृत्तानुसार, एक जानेवारी २०२३ रोजी गॅस सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल होऊ शकतो. यासोबतच आरबीआयच्या निर्देशानुसार, बँक लॉकरबाबत नियम बदलले जातील. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉईंट्सचे नियम बदलणार आहेत. तर जीएसटीच्या इ-इन्व्हायसिंगची मर्यादा घटवली जाणार आहे.

जीएसटी ई इन्व्हायसिंग अथवा इलेक्ट्रॉनिक बिलचे नियम १ जानेवारी २०२३ पासून बदलतील. यासाठीची मर्यादा २० कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपयांवर आणली जाणार आहे. आरबीआयच्या नव्या निर्देशानुसार, बँक लॉकरचे नियम बदलतील. जर लॉकरमध्ये ठेवलेल्या साहित्याचे नुकसान होईल, त्यावेळी त्याची जबाबदारी बँकेवर येणार आहे. नव्या नियमांची माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल. नव्या वर्षात वाहनांच्या दरातही वाढ होईल. मारुती सुझुकी, एमजी मोटर्स, ह्युंदाई, ऑडी, मर्सिडिस आदी अनेक कंपन्या, तसेच टाटांच्या कमर्शिअल व्हेइकल्सच्या दरातही याच महिन्यात वाढ केली जाईल. एचडीएफसी बँकेनेही क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉइंट्समध्ये बदल केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here