हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
रामनगर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी पुन्हा एकदा मतदारांच्या दारात येऊ लागली आहेत. मतदारांकडून नेत्यांना त्यांच्याच आश्वासनांची आठवण करून दिली जात आहे. यात बाराबंकी जिल्ह्यातील एका साखर कारखान्यांचा विषय चर्चेत आला आहे.
बाराबंकीचा बुढवल साखर कारखाना गेल्या ११ वर्षांपासून बंद आहे. या ११ वर्षांत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात दोन दोन मुख्यमंत्र्यांनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले. पण, हे आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा साखर कारखानाच स्थानिक मुद्दा ठरू लागला आहे. कारखान बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेच पण, कामगार मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाले आहेत.
मुळात बुडवल साखर कारखाना १९३१ मध्ये सुरू झाला होता. एकेकाळी साखर हंगामात या कारखान्यात १२०० कर्मचारी काम करत होते. तर, इतर दिवसांमध्ये कारखान्यांतून ५०० कामगारांना रोजगार मिळत होता. कारखान्याची क्षमता वाढवण्यासाठी मुलायमसिंह यादव यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची ८५ एकर जमीन अधिकृत करून घेण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनही केले होते. पण, पुढे काहीच घडले नाही.
त्यानंतर भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर कारखाना पुन्हा उभा करण्यासाठी साहित्य आणण्यात आले. पण, ते पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर बसपच्या हातात सत्ता आली. त्या काळात कारखाना साडे चार कोटींना विकण्यात आला. त्यानंतर आलेल्या अखिलेश यादव यांच्या सरकारने कारखाना चालवण्याची ग्वाही दिली होती. पण, पाच वर्षांच्या कार्यकाळानंतरही काहीच हालचाली झाल्या नाहीत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा साखर कारखाना सुरू करण्याच्या चर्चेला सुरुवात केली. पण, आतापर्यंत काहीच हालचाली झाल्याचे दिसत नाही. कारखाना सुरू नसल्यामुळे ऊस उत्पादकांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच बुडवल साखर कारखान्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp