लातूर / अहमदपूर : अल्पावधीतच सिद्धी शुगरने साखर उद्योगात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. यावर्षीही पूर्ण क्षमतेने गाळप होणार असून, आता गाळप क्षमतेसह साखरेची गुणवत्ता, दर्जा वाढणार आहे. या हंगामात कारखाना पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आ. बाबासाहेब पाटील यांनी केले.
उजना येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बाराव्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ भक्तीस्थळाचे मठाधिपती आचार्य गुरुराज स्वामी महाराज व ह.भ.प कृष्णदास महाराज महाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते. व्यासपीठावर चंदाताई पाटील, व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, संचालिका दिपाली जाधव, संचालक सुरज पाटील, उपाध्यक्ष पी. जी. होनराव, शिवानंद हेंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडने दिवाळीसाठी साखर वाटप केली. कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणूनही आमदार पाटील यांनी यावेळी जाहीर केला. माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी कारखाना परिसरातील आसवनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी फॅक्टरी मॅनेजर बालाजी कावळगुडीकर, जनरल मॅनेजर शंकर पिसाळ, बिसलरी मॅनेजर राजपाल शिंदे, संदिप पाटील यांची उपस्थिती होती.