यंदा मान्सूनच्या आगमनाला होणार थोडा उशीर, जाणून घ्या केव्हा येणार केरळमध्ये ?

नवी दिल्ली : केरळमध्ये मान्सूनची सुरुवात ४ जूनच्या आसपास होईल असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी जाहीर केले. IMD च्या म्हणण्यानुसार, पुढील पाच दिवसांत पूर्वोत्तर भारतामध्ये हलका ते मध्यम व्यापक प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. IMD ने एका निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी केरळमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनची सुरुवात नियमित कालावधीच्या तुलनेत थोड्या उशीरा होण्याचे अनुमान आहे.

गेल्यावर्षी, IMD ने जाहीर केलेल्या अनुमानानंतर दोन दिवसांनी, २९ मे रोजी केरळमध्ये मान्सूनची सुरुवात झाली होती. IMD ने सांगितले की, गेल्या १८ वर्षांमध्ये (२००५-२०२२) यांदरम्यान केरळमधील मान्सूनच्या आगमनाचे पूर्वानुमान २०१५ चा अपवाद वगळता इतर वर्षी खरे ठरले आहे. यांदरम्यान, हवामान विभागाने सांगितले की, पुढील तीन दिवसांत हरियाणा आणि दिल्ली, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग तसेच राजस्थानच्या वेगवेगळ्या भागात आणि पुढील दोन दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भात धुळीचे वादळ आणि धुळीसह जोरदार वारे वाहिल अशी शक्यता आहे.

IMD ने पुढील पाच दिवसांत पूर्वोत्तर भारतामध्ये हलका ते मध्यम व्यापक पाऊस कोसळण्याचे पुर्वानुमान व्यक्त केले आहे. १६ ते २० मे या कालवाधीत आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here