थोरात साखर कारखान्याने संगमनेर तालुक्याच्या आर्थिक विकासात मोठे योगदान : आमदार बाळासाहेब थोरात

अहिल्यानगर : थोरात साखर कारखान्याने संगमनेर तालुक्याच्या आर्थिक विकासात मोठे योगदान दिले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर कारखान्यासह सर्व सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य माणसाच्या जिवनात आनंद निर्माण करण्यासाठी सहकारी संस्थांनी मोठे काम केले आहे. यावर्षी तालुक्यासह सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने हे आर्थिक वर्ष शेतकऱ्यांसह सर्वांना चांगले जाणार आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. काल बुधवारी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ म्हणाले की, हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख कामगार यांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम करावे. डॉ. सुधीर तांबे म्हणाले, महाराष्ट्रात सहकार चळवळीने ग्रामीण विकासात मोठे काम केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम राज्यातील नव्हे तर देशातील सहकारासाठी मार्गदर्शक काम केले आहे. यावेळी डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीत देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, राजेंद्र गुंजाळ, सुहास आहेर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी संचालक घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here