मुंबई: कोरोनाच्या वाढत्या फैलावाबाबत महाराष्ट्र सरकारने बाहेरुन जे लोक विमान आणि रस्त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात येत आहेत त्यांच्यासाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. गाइडलाइन्स नुसार घरगुती उड्डाणाच्या माध्यमातून दिल्ली एनसीआर, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून येणार्या लोकांना आरटी पीसीआर निगेटीव रिपोर्ट आणावा लागेल. त्यांचे रिपोर्ट बोर्डिंग एयरपोर्ट वर चेक होईल. रिपोर्ट चा सैंपल गेल्या 72 तासांमधीलच हवा. जर टेस्ट चा निगेटीव्ह रिपोर्ट नसेल तर मुंबई एअरपोर्ट वर आपल्या खर्चावर आरटीपीसीआर टेस्ट करावा लागेल. त्यानंतर आपल्या घरी जावू शकता.
याशिवाय जिथे थांबला आहात तिथला पत्ता आणि बाकीची माहिती द्यावी लागेल जेणेकरुन टेस्ट पॉजिटिव्ह असेल तर ट्रेस करता येवू शकेल. टेस्ट पॉजिटीव्ह आल्यास नियमानुसार उपचार होईल.
दिल्ली एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यातून निघणार्या किंवा इथून जाणार्या ट्रेन्सच्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआर निगेटीव्ह रिपोर्ट आणावा लागेल. महाराष्ट्रामध्ये घुसल्यास जास्तीत जास्त 96 तास पूर्वी सैंपल घेतले गेले असावे. ज्यांच्या जवळ निगेटीव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट नसेल त्यांना त्या स्टेशन वर लक्षण आणि तापाची तपासणी केली जाईल, ज्यामध्ये लक्षणे नसतील त्यांना जावू दिले जाईल. ज्यांच्यामध्ये लक्षणे असतील त्यांचे विलगीकरण करुन त्यांची एंटीजन टेस्ट केली जाईल. एंटीजन टेस्ट निगेटीव्ह आल्यावरच त्यांना घरी सोडले जाईल. जे टेस्ट करणार नाहीत किवा पौजिटिव्ह येतील त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये पाठवले जाईल. जिथे आपल्या खर्चाने उपचार करावे लागतील.
सीमावर्ती जिल्ह्यामंध्ये दिल्ली एनसीआर, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून येणार्या प्रवाशांची राज्याच्या सीमेवर तपासणी केली जाईल. ज्यामध्ये लक्षणे नसतील त्यांना गंतव्य पर्यंत जावू दिले जाईल. ज्यामध्ये लक्षणे असतील त्यांना परत घरी जाण्याचा पर्याय दिला जाईल. तर जें टेस्ट करणार नाहीत, किंवा पॉजिटीव्ह असतील त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये पाठवले जाईल.