5 करोड पर्यंत टर्नओव्हर असणाऱ्यांना जीएसटी रिटर्न नाही भरावा लागणार; 40 लाख व्यापार्‍यांना मिळणार दिलासा

नवी दिल्ली : दोन वर्षांपासून टाळतआलेला जीएसटीचा पहिला वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्ट च्या फाईलिंगमुळे छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळू शकतो. जीएसटी च्या कौन्सिलच्या 20 सप्टेबरला होणार्‍या बैठकीत, पाच करोड रुपयांपेक्षा कमी टर्नओवर असणार्‍यांना 2017-18 या अर्थिक वर्षात GSTR-9, GSTR-9A आणि GSTR-9C भरण्यापासून मुक्ती मिळू शकते.

यामुळे जवळपास 30 ते 40 लाख व्यापार्‍यांना/उद्योजकांना दिलासा मिळेल. सरकारकडे व्यापार्‍यांचे मासिक आणि तिमाही रिटर्न चे आकडे नोंद केलेले आहेत. तांत्रिक आडचणींमुळे जीएसटी रीटर्नची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती. पुढच्या वर्षी पासून इलेक्ट्रॉनिक टॅक्स इनवॉइस (ई-इनवॉइस) लागू झाल्यानंतर वार्षिक परतावा भरण्याची गरज नाही.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, सरकारने पहिल्या वर्षाचा वार्षिक परतावा भरण्यापासून छोट्या व्यापार्‍यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची घोषणा या कौन्सिल बैठक़ीत होवू शकते. व्यापार जगतातही याबाबत मोठी चर्चा सुरु आहे आणि टॅक्स भरणार्‍यांनी फाइलिंग पूर्णपणे थांबवले आहे. सामान्य डिलर्सना वार्षिक GSTR-9, कंपोजिशन डिलर्सना -GSTR-9A आणि 2 करोडपेक्षा अधिक टर्नओवर असणार्‍यांना GSTR-9C अशा स्वरुपात ऑडिट रिपोर्ट फाइल करावा लागतो.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here