बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
वाराणसी (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
नगरा परीक्षेत्रातील ताडीबडा गावात शेतकऱ्यांचा हजारो टन ऊस सुकून जात आहे. घोसी साखर कारखान्यांकडून वेळेत उसाचे वजन होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप तीव्र होत आहे.
परिसरातील रसडा साखर कारखाना बंद पडल्यानंतर शेतकऱ्यांनी उसाची लागवडच कमी केली होती. पण, ज्यांनी उसाची शेती केली ते आता वेगळ्याच संकटात सापडले आहेत. सरकारकडून कोणतिही मदत मिळाली नाही आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरच ऊस पडून राहिल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
रसडा साखर कारखाना बंद पडल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस घोसी साखर कारखान्याना दिला होता. ताडीबडा गावात कारखान्याने नव्याने ऊस केंद्र सुरू आहे. त्याठिकाणी शेतकरी आपला ऊस घेऊन येत आहेत. पण, उसाचे वजन कधी होणार हे सांगणारे तेथे कोणच नाही. केंद्रच्या कम्पाऊंडमध्ये जवळपास २४ उसाचे ट्रॅक्टर उभे आहेत. त्यांना अद्याप उसाच्या वजना संदर्भात काहीच माहिती देण्यात आलेली नाही.
दुसरीकडे शेतकरी उसाचे वजन करून घेण्यासाठी घोसी साखर कारखान्याच्या फेऱ्या मारत आहे. पण, कारखान्यातील अधिकारी त्यांना दाद देण्यास तयार नाहीत. या संदर्भात चचया येथील शेतकरी प्रधान देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, ट्रलीवर ऊस सुकून जात आहे. कारखान्यात जाऊन उसाचे वजन करून घेण्याची विनंती करून आलो आहे. तरी आतापर्यंत उसाचे वजन झालेली नाही. अधिकाऱ्यांकडून कोणतिही स्पष्ट माहिती मिळत नाही. येत्या दोन दिवसांत जर, उसाचे वजन झाले नाही, तर शेतकरी रस्त्यांवर उतरतील, असा इशारा सिंह यांनी दिला आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp