हजारो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रात दाखल

सांगली : विदर्भ, मराठवाड्यातील मजुरांचे तांडे पश्चिम महाराष्ट्रात येऊ लागले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत. यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. स्थलांतरामुळे मजुरांचे मतदान होऊ शकणार नाही, याचा फटका तेथील उमेदवारांना बसणार आहे. मतदार जिल्ह्याबाहेर निघून गेल्याने एकूण मतदानाची टक्केवारी घसरणार आहे. प्रशासनालाही या घटत्या टक्केवारीची चिंता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ७० हजारहून अधिक ऊसतोड मजूर विदर्भ, मराठवाडा आणि विजापूर जिल्ह्यांतून येतात. प्रामुख्याने बीड, परभणी, जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतून मजूर येतात. दिवाळी संपताच त्यांचा प्रवास कारखान्यांकडे सुरू होतो. तर मार्चमध्ये हंगाम संपताच परततात. सध्या महाराष्ट्रभरात निवडणुका सुरू असल्याने या स्थलांतरित मजुरांच्या मतदानाची चिंता राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आहे. त्यांचे मतदान बुडणार असल्याने फटका बसणार आहे. मराठवाड्यातील ऊसतोड मजुरांच्या पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतराविषयी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही चिंता व्यक्त केली होती. सद्यस्थितीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या रस्त्यांवर हजारो मजुरांची वाहने दिसू लागली आहेत. कारखाना परिसरात त्यांच्या झोपड्या उभ्या राहू लागल्या आहेत.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here