पिलीभीत : बरखेडा येथील नोबल शुगर लिमिटेडमधील तोलाई विभागातील तीन लिपिकांवर शेतकऱ्यांच्या उसाचे वजन वाढवून घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याबाबत कारखान्याचे सुरक्षा अधिकारी उमेश कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. कागदोपत्री शेतकऱ्याच्या उसाचे वजन दुप्पटीने वाढवून पैसे हडप करण्यात आले.
जदानाबाद पोलिस ठाण्यांतर्गत उझिनिया रामपुरा गावातील एक शेतकरी गुड्डी यांनी ६० क्विंटल ऊस आणला होता. त्याची नोंदणी करून वजन कारखान्याच्या गेटवर करण्यात आले. मात्र, नंतर शेतकऱ्याला ट्रॅक्टर-ट्रॉलीबरोबर पावती देण्यात आली. त्यामध्ये १२० क्विंटल उसाचे वजन दाखविण्यात आले. याबाबत जेव्हा लिपिकांना विचारण्यात आले, त्यावेळी आकाश, सत्यम आणि महेश पाल यांनी शेतकऱ्याबरोबर मिलिभगत करून वजनात हेराफेरी केल्याचे कबूल केले.
बरखेडा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विरेश कुमार यांनी सांगितले की, लिपिक आणि शेतकऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.