ओडिशामध्ये तीन इथेनॉल युनिट्सच्या उभारणीस मंजुरी

भुवनेश्वर : मुख्य सचिव प्रदीप जेना यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय single window clearance authority (SLSWCA) ने १,२५० कोटी रुपये गुंतवणुकीच्या धान्यावर आधारित तीन इथेनॉल प्लांटसह आठ औद्योगिक युनिट्सना मंजुरी दिली आहे. धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादनात अग्रेसर असलेल्या कंपनीने ८१४.५४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पश्चिम ओडिसा जिल्ह्यांमध्ये तीन युनिट स्थापन केले जातील असा प्रस्ताव दिला आहे.

याबाबत योजनेच्या प्रस्तावकांनी २९३.५४ कोटी रुपये खर्चून नबरंगपुर जिल्ह्यातील बामणी आयडीसीओ औद्योगिक वसाहतीमध्ये एक युनिट स्थापन करण्याची योजना तयार केली आहे. तर दुसरी योजना सोनेपूर जिल्ह्यात २७१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने स्थापन केली जाईल. बलांगीर जिल्ह्यात २५० कोटी रुपये खर्चून तिसरे युनिट उभारले जाणार आहे. या तिन्ही युनिट्समधून जवळपास ५०० लोकांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here