रुपामाता ॲग्रोटेकचे तीन लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : चेअरमन, अॅड. व्यंकटराव गुंड

धाराशिव : पाडोळी (आ.) येथील रुपामाता अॅग्रोटेक प्रा. लि. संचलित रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. एक या कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगामाचा रोलर पूजन सोहळा रविवारी (दि. ११) उत्साहात झाला. रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन तथा भाजपचे प्रदेश सदस्य अॅड. व्यंकटराव गुंड व प्रगतशील शेतकरी रामदास गुंड यांच्या हस्ते विधीवत रोलर पूजन करण्यात आले. कारखान्याच्या माध्यमातून येणाऱ्या गळीत हंगामात ३ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे, असे चेअरमन अॅड. व्यंकटराव गुंड यांनी सांगितले.

चेअरमन अॅड. गुंड म्हणाले की, धाराशिव-तुळजापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांची, सुशिक्षित युवकांची गरज लक्षात घेऊन ग्रामीण भागात कारखाना उभारण्याचा संकल्प केला होता. यंदाच्या हंगामात या कारखान्याच्या माध्यमातून तीन लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी वाहतूक यंत्रणा, ऊस तोडणी यंत्रणा सज्ज आहे. यावेळी कारखाना वेळेत चालू होण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सर्व विभागाची कामे वेळेत पूर्ण करावीत असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, दूध उत्पादक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here