नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी तीन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य भारतातील बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा, पूर्व मध्य प्रदेशाचा यामध्ये समावेश आहे. देशाच्या काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. सततच्या पावसाने काही भागात पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये पूर्व भारताच्या बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा, झारखंडच्या काही भागांचा समावेश आहे.
सततच्या पावसाने बिहारच्या मुझफ्फरपूर, नवादा, कैमूर, रोहतास, अरवल आणि नालंदामध्ये अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत भभुआ, अधवारा, ठाकूरगंज, त्रिवेणी, इंद्रपुरी, चेनारी, सिसवन, चांद, मुसहरी आणि सरैया येथे जोरदार पाऊस झाला.
दुसरीकडे भारताच्या दक्षिण-पश्चिम क्षेत्रात मान्सूनची गती मंदावल्याने राजस्थानमध्ये आणखी एक आठवडाभर कोरडे हवामान राहील. तापमान दोन ते तीन डिग्री सेल्सीअसने वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार मान्सून पोहोचण्यासाठी एक आठवडा लागू शकतो. राजधानी दिल्लीतही उकाडा टिकून आहे. आगामी काही काळात टिहरी, पौडी, नैनिताल, अल्मोडा जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link