उसाच्या नव्या तीन प्रजाती विकसित, बंपर उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मिळणार भरघोस उत्पन्न

भारताच्या ऊस उत्पादनाचा जगात दबदबा आहे. भारतीय उसाला मागणी इतर अनेक देशांकडून असते. मात्र, ऊस असो वा इतर कोणतेही पिक. त्याच्या सर्वोत्तम उत्पादनासाठी चांगल्या प्रतीच्या बियाण्याची गरज असते. त्यामुळे संशोधन संस्थांकडून याबाबतचे प्रयत्न सुरू असतात. पिकाचे असे वाण विकसित करण्याचा प्रयत्न असतो की, जे पाऊस, उन्हाचा तडाखा सहन करू शकेल.

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, भारतीय ऊस संशोधन संस्थेने उसाच्या अशा तीन प्रजाती विकसित केल्या आहेत. या प्रजाती अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती सहन करू शकतात. त्याच्या लागवडीने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, ऊस संशोधन संस्थेने दीर्घकालीन प्रयत्ननंतर कोएल ११२०६ ही प्रजाती विकसित केली आहे. याच्या रसात शर्करेचे प्रमाण १७.६५ टक्के असून उसाचे प्रमाण १३.४२ टक्के इतके आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांत याची लागवड करता येऊ शकते. हा ऊस लांबीला थोडा कमी आहे. कोएल ०९२०४ या प्रजातीची लागवड उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग येथे केली जावू शकते. याचे उत्पादन प्रती हेक्टर ८२.८ टन मिळू शकेल. याच्या रसात शर्करा १७ टक्के आणि पोल केन १३.२२ टक्के आहे.

उत्तर प्रदेशसाठी सर्वाधिक उपयुक्त असलेल्या कोएल १४२०१ या प्रजातीचा ऊस पिवळ्या रंगाचा आहे. एक हेक्टरमध्ये याचे ९५ टनापर्यंत उत्पादन मिळू शकते. यामध्ये शर्करेचे प्रमाण १८.६० टक्के आहे. या तिन्ही वाणांपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here