लखनऊ : ऊस बिल थकबाकी, उत्पादनात सातत्याने होत असलेली घट, ऊस लागवडी साठी दिवसेंदिवस वाढणारा खर्च आणि उत्पन्नात होत असलेली कपात यामुळे अडचणीत असणार्या ऊस शेतकर्यांचे नशीब लवकरच बदलणार असल्याचे चित्र आहे.
संशोधकांनी ऊसाच्या अशा नवीन तीन वाणां चा शोध लावला आहे, ज्यामुळे शेतकर्यांना चांगला फायदा होईल. को.से. 13235, को.से. 13452 आणि को.से. 10239 हेच ते तीन वाण विकसित करण्यात आले आहेत. हे तीनही वाण रोग आणि किटक प्रतिरोधी आहेत.
शाहजहांपूरातील ऊस संशोधन संस्थानद्वारा सतत 10 वर्षापर्यतच्या केलेल्या अथक परिश्रमाचे फळ मिळणार आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या संशोधनामुळे ऊस शेतकर्यांना आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळेल. शाहजहांपूरातील ऊस संशोधन संस्थान कडून विकसित केलेल्या या जाती रोगमुक्त असून साखरेचा उताराह चांगला देतील, तसेच कुठल्याही प्रकारच्या मातीत या वाणांचे पीक घेता येते.
हि आहेत वैशिष्ठये :
को.से. 13452 : हा मध्यम उशीरा मिळणारा ऊस आहे. 86 ते 95 टन प्रति हेक्टर याचे उत्पादन होईल. को.से. 13235: शेतकर्यांसाठी हे वाण वरदान होवू शकेल. कारण हा लवकर पिकणारा ऊस आहे. याचे उत्पादन 81 पर्यत 92 टन प्रति हेक्टर आहे. को.से. 10239 : हा मध्यम उशीरा पिकणारा ऊस आहे. वाढत्या पाण्यातही याचे उत्पादन 63 पासून 79 टन प्रति हेक्टर होते. ओसाड जमीनीवर या ऊसाचे उत्पादन 61 ते 70 टन दिसून आले आहे.
शाहजहांपूरचे ऊस शोध संस्थानचे डायरेक्टर ज्योत्सनेंद्र सिंह यांनी सांगितले की, हे तीन वाण रोगमुक्त असल्यामुळे साखरेचा रेकॉर्ड ब्रेक उतारा देतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या मातीत या वाणांचे पिक उत्पादन घेतले जावू शकते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.