मेरठ : मेरठ जिल्ह्यातील दौराला, मवाना आणि किनौनी साखर कारखान्यानि सोमवारी 25.13 करोड रुपयांची ऊस थकबाकी भागवल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी दिली.
ते म्हणाले, मवाना कारखान्याने 15.15 करोड, दौराला ने 7.28 करोड आणि किनौनी ने 2.70 करोड रुपयांची थकबाकी भागवली आहे. आतापर्यंत गाळप हंगाम 2019-20 चे 1543.60 करोड रुपये भागवण्यात आले आहेत. उर्वरीत ऊसाचे पैसे भागवण्यासाठी कारखान्यांना निर्देश देण्यात आले आहेत. डीसीओ यांनी सांगितले की, सर्व ऊस समित्यांमध्ये 20 जुलै पासून ग्रामस्तरीय ऊस सर्वेक्षण व सट्टा प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
शेतकर्यांना विनंती आहे की, त्यांनी 63 स्तंभांच्या सूचनेचे व्यवस्थित अवलोकन करावे. ज्यामुळे पुढच्या ऊस गाळप हंगामामध्ये ऊस पुरवठ्यामध्ये असुविधा होवू नये. कोरोनापासून बचावासाठी ऊस भवनाचे तीन वेळा सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.
मुख्य प्रवेश द्वारावर कोविड हेल्पडेस्क स्थापित करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये मवाना कारखान्याने 5, दौराला ने 59, किनौनी ने 41, नगलामल कारखान्याने 80, सकौती ने 16 गावांसहीत एकूण 198 गावांना सॅनिटाइज केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.