लखनौ: उत्तर प्रदेशचा साखर उद्योग आणि ऊस विकास विभागाने विकसित केलेल्या ‘स्मार्ट शुगरकेन फार्मर’ पोर्टल आणि ‘ई-शुगरकेन ॲप’ची एकात्मिक आणि पारदर्शक प्रणालीची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू इतर राज्यांच्या १७ सदस्यांच्या पथकाने १३ ऑगस्ट रोजी सितापुरमधील दालमिया साखर कारखाना, रामगढ विभाातील भगवन्तापुर गाव, गोपालपुर तसेच जरिगांवा येथे ऑनलाइन ऊस सर्वेक्षण, मूळ कोटा, ऊस दिनदर्शिका, उसाच्या उतारा निश्चित करणे आणि जारी करणे, गावपातळीवरील सर्वेक्षण, ऊस नोदणी, दुरुस्ती, ऊस पुरवठा, नवीन सभासद बनणे यासंबंधी एकात्मिक आणि पारदर्शक प्रणालीबद्दल मूलभूत माहिती घेतली.
शिष्टमंडळाने सीतापूर जिल्ह्यातील रामगढ येथील सहकारी ऊस विकास समितीमध्ये कार्यरत असलेल्या तक्रार/चौकशी केंद्राला भेट दिली. केंद्रात ‘स्मार्ट शुगरकेन फार्मर’ पोर्टल आणि ‘ई-शुगरकेन ॲप’ द्वारे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक प्रत्यक्षपणे पाहण्यात आले. कामात सुलभता, एकसमानता आणि पारदर्शकता यासारखे मूळ उद्दिष्टे तसेच प्रभावी देखरेखीचेही निरीक्षण करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे नियंत्रण आणि त्वरित निराकरण कसे केले जाते याचा अनुभव शिष्टमंडळाने घेतला.
उत्तर प्रदेशचे ऊस आणि साखर आयुक्त यांच्याकडून भारत सरकारच्या नेतृत्वाखाली या दौरा आयोजित करण्यात आला होता. विविध राज्यांतून आलेल्या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी ‘स्मार्ट शुगरकेन फार्मर’ पोर्टल आणि ई-शुगरकेन ॲपच्या अंमलबजावणीशी संबंधित त्यांच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक प्रक्रिया आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी कार्यक्रमाच्या शेवटी संवाद साधला. प्रश्नोत्तराचा तासही आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अखेरीस, भारत सरकारच्या नेतृत्वाखाली आलेले शिष्टमंडळ उत्तर प्रदेशचा ऊस विभाग आणि साखर कारखानदारांनी ‘स्मार्ट शुगरकेन फार्मर’ पोर्टल आणि ‘ई-गन्ना अॅप-‘द्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या अभूतपूर्व कामामुळे प्रभावित झाले. शुगरकेन अॅप प्रणालीने केलेल्या कामाचे कौतुक त्यांनी केले. महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार, कर्नाटक राज्य आयुक्त, ऊस विकास आणि संचालक साखर एम.आर. रविकुमार, तामिळनाडू राज्याचे अतिरिक्त आयुक्त साखर बी. बालमुरुगन त्यांच्या टीम सदस्यांसह उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात, दिनांक १४.०८.२०२४ रोजी उत्तर प्रदेशचे ऊस व साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ऊस विकास विभागाने विकसित केलेले ‘स्मार्ट शुगरकेन फार्मर’ पोर्टल आणि ‘ई-शुगरकेन ॲप’ या विषयावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लखनौच्या शुगरकेन फार्मर्स इन्स्टिट्यूटच्या सभागृहात राज्यांच्या भेटी देणाऱ्या शिष्टमंडळांसह तपशीलवार विश्लेषणात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.