टिकोला साखर कारखान्याचा गाळप हंगाम पूर्ण

मुजफ्फरनगर : टिकौला साखर कारखान्याने आपला गाळप हंगाम पूर्ण केला आहे. कारखान्याने आज गाळप बंद करण्याची नोटीस देताना तीन दिवसांपूर्वी उर्वरीत उसाच्या पावत्या दिल्या होत्या. मात्र, आज दुपारी जेव्हा उसाने भरलेला ट्रॅक्टर कारखान्याच्या गेटवर आल्यानंतर तो स्वीकारण्यास मनाई करण्यात आली. यावरून वाद निर्माण झाला. जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विदेवी यांच्या आदेशानंतर कारखान्याने ऊस स्वीकारण्यास अनुमती दिली.

जिल्ह्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. भैसाना (बुढाना) आणि खाईखेडी साखर कारखाना आधीच बंद झाला आहे. ऊस बिले अदा करण्यात अग्रेसर राहिलेल्या टिकोला कारखान्याचा गाळप हंगामही शुक्रवारी समाप्त झाला. त्यासाठी कारखान्याने शेतकऱ्यांना उर्वरीत ऊस पाठविण्यासाठी तीन दिवसांपूर्वी नोटीस दिली होती. मात्र, आज जेव्हा शेतकरी ऊस घेऊन आले तेव्हा कारखान्याने ऊस स्वीकारण्यास नकार दिला. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्रीपर्यंत आलेला ऊस स्वीकारला जाईल. त्यांनी कारखान्याच्या प्रशासनास याबाबत निर्देश दिले. त्यानंतर ऊस स्वीकारण्यात आला. डॉ. द्विवेदी म्हणाले की, इतर कारखान्यांच्या क्षेत्रात ऊस शिल्लक आहे. तो पूर्ण झाल्यानंतर कारखाने बंद केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here