साखर कारखान्यांना थकबाकी देण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरविणार

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) न देणाऱ्या साखर कारखान्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त नितेश पाटील यांनी दिला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना वजन, कामगारांचे वेतन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी याबाबत सरकारने नियम पाळावे लागतील. जिल्हा पंचायत सभागृहात ते शेतकरी आणि साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

दि हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पाटील यांनी उसाचे कमी वजन अथवा इतर प्रकारे कारखान्यांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीबद्दल कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी काही कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून दिले. उपायुक्त नितेश पाटील यांनी अशा कारखान्यांना नोटीस जारी केली जाईल असे सांगितले.

ते म्हणाले की, सर्व कारखान्यांना ऊस बिले देण्यास निश्चित कालावधी दिला जाईल. त्याचे कठोरपणे पालन करण्यास सांगितले जाईल. ते म्हणाले की, साखर कारखाने सुरू करण्यापूर्वी सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून सर्व परवाने घेतले आहेत का, याची पडताळणी केली जावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here