हस्तीनापूर : गंगा पुलाला जोडणारा रस्ता खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. त्यांना आता गुऱ्हाळघरांना ऊस विक्री करावा लागत आहे. मिळेल त्या दराला ऊस विक्री करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गंगा नदीच्या पलीकडील तिरावरील खेडी कला, बधुवा गावासह इतर ठिकाणचे शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत. त्यांचा ऊस मवाना तथा टिकौला साखर कारखान्याला पाठविण्याचा करार झाला आहे.
यापूर्वी ते गंगा पुलावरून ये-जा करीत होते. मात्र, आता पुलाला जोडणारा अॅप्रोच रस्ता तुटल्याने ऊस पाठवण्यास खूप अडचणी येत आहेत. खेडी कला येथील मलखान सिंह, दया सिंह, लिलू सिंह, मोहन पाल आदींनी सांगितले की, त्यांचा ऊसाचा उत्पादन खर्चही मिळत नाही अशी स्थिती आली आहे. कारखान्याला ऊस पाठवणे शक्य नसल्याने त्यांना गुऱ्हाळांना २३० ते २४० रुपयांवर ऊस विकण्याची वेळ आली आहे. जर पूल लवकर सुरू झाला नाही, तर मोठे नुकसान होईल असे या शेतकऱ्यांनी सांगितले.