सहारनपूर : गावागावात ऊस सर्व्हेचे सादरीकरण करणाऱ्या सर्व्हेअर आणि सुपरवायझरनी शेतकऱ्यांमध्ये ऊस बांधणीविषयी जनजागृती करावी, असे आवाहन ऊस विभागाचे उपायुक्त ओ. पी. सिंह केले. ऊसाची वेळेवर बांधणी केल्यास उत्पादन वाढते, आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होईल, असे मत सिंह यांनी व्यक्त केले.
जोरदार वाऱ्याने अथवा वादळाने ऊस पडण्याची शक्यता असते. ऊस पडल्यास उत्पादन घटण्याचा धोका असतो. तसे झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे याबाबत जनजागृती करावी, अशी सूचना सिंह यांनी सुपरवायझर, सर्व्हेअरना केली. याशिवाय उसाच्या सर्व्हेचे सादरीकरण झाल्यानंतर त्याचे सादरीकरण तत्काळ कम्प्युटरमध्ये फीड करावे अशी सूचना करण्यात आली. याशिवाय साखर कारखान्याच्या व्यवस्थापकांना गळीत हंगाम नियोजनाबाबत निर्देश देण्यात आले. अधिकाऱ्यांनी स्वतः फील्डवर जावून शेतकऱ्यांमध्ये ऊस बांधणीविषयी जागृती करण्याचे आवाहन केले आहे.