पुणे : 2023-24 चा ऊस गळीत हंगाम संपला आणि 24-25 गाळप हंगामाची तयारी सुरु झाली असतानाही राज्यातील सुमारे 37 साखर कारखान्यांकडे 276 कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. साखर आयुक्त कार्यालयाने एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकार्यांकडे महसूल प्रमाणपत्र वसुलीची पत्रे पाठविली असून याआधी 6 कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
चालू हंगामात 208 सहकारी व खासगी कारखान्यांकडून 1076 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. गाळप उसाची एफआरपी रक्कम तोडणी ओढणी कपात करून 27,513 कोटी होते. परंतु 171 कारखान्यांनीच फक्त पूर्ण एफआरपी अदा केली आहे. तर 32 कारखान्यांनी 99 टक्के 4 कारखान्यांनी 80 टक्के तर एका कारखान्याने 60 टक्के एफआरपी अदा केली आहे. आतापर्यंत सुमारे 99.25 टक्के एफआरपी देण्यात आली आहे. 276 कोटींची एफआरपी थकीत आहे. सहा कारखान्यांवर एफआरपी अदा न केल्यामुळे महसूल प्रमाणात वसुलीची कारवाई झाली आहे. 10 कारखान्यांना साखर आयुक्तांकडून जिल्हाधिकार्यांकडे महसूल प्रमाणात वसुलीसाठीची पत्रे पाठवली आहेत.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.