पुणे : शेतकऱ्यांना १४ दिवसांत ऊस बिले न देणाऱ्या कारखान्यांनी पंधरवडा ऊस दर नियम कायद्यानुसार व्याज देणे बंधनकारक आहे. अशा व्याज न देणाऱ्या कारखान्यांना नव्या हंगामात गाळप परवाना देऊ नये. जर परवाने दिल्यास साखर आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा प्रहार जनशक्तीचे जिल्हाप्रमुख अभिजित पोटे यांनी दिला आहे. पोटे यांनी पुण्यात साखर संकुलात साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची भेट घेतली. यावेळी पंधरवडा नियमानुसार, काही कारखान्याने बिल दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. साखर आयुक्तांनी प्रहार जनशक्तीच्या पाठपुराव्यानंतर नगर जिल्ह्यातील पाच कारखान्यांवर जप्तीची, आरआरसीची कारवाई केली आहे असे सांगितले. जिल्ह्यातील ९९ टक्के साखर कारखान्यानी नियमानुसार एफआरपी दिल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, पोटे यांनी यावर आक्षेप घेतला. पंधरवडा व्याजास शेतकऱ्यांनीच नकार दिला आहे, असे साखर आयुक्तांनी सांगितले. त्यावर अशा प्रकारचे अॅग्रीमेंट शेतकऱ्यांनी केलेले नाही. साखर कारखान्यांनी बोगस कागदपत्रे सादर केली आहेत, असा आरोप पोटे यांनी केला.
Home Marathi Indian Sugar News in Marathi थकीत ऊस बिलावर व्याज न देणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत :...
Recent Posts
महाराष्ट्र : २३ जानेवारी रोजी ‘व्हीएसआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि २०२३-२४ पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) ची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी, २३ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता...
Daily Sugar Market Update By Vizzie – 21/01/2025
ChiniMandi, Mumbai: 21st Jan 2025
Domestic Market
Domestic sugar prices were stable to higher
After a sharp surge in yesterday’s session, domestic sugar prices in major markets...
महाराष्ट्र: राज्य में 466.48 लाख क्विंटल हुआ चीनी का उत्पादन, पिछले साल से लगभग...
पुणे : इस पेराई सत्र में 20 जनवरी 2025 तक राज्य में कुल 196 चीनी मिलें चालू हो चुकी हैं। चीनी आयुक्तालय द्वारा जारी...
साखर निर्यातीला सरकारची मंजुरी हे कारखाने आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पाऊल : इस्मा
नवी दिल्ली : चालू ऊस गळीत हंगामासाठी एक दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) साखर निर्यातीला मान्यता देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक...
કર્ણાટક: ખેડૂતો ટ્રેક્ટર રેલીઓ સાથે વિરોધ ઉગ્ર બનાવશે
મૈસુર: કર્ણાટક રાજ્ય શેરડી ઉત્પાદક સંગઠનના કુરુબુરુ શાંતાકુમારે જાહેરાત કરી કે ખેડૂતોની વિવિધ માંગણીઓ પૂરી કરવા માટે સરકાર પર દબાણ લાવવા માટે 26 જાન્યુઆરીએ...
ભારતે નિકાસને મંજૂરી આપતાં ખાંડના ભાવ ત્રણ વર્ષના તળિયે પહોંચ્યા
નવી દિલ્હી: સોમવારે ખાંડના ભાવ ત્રણ વર્ષના નીચલા સ્તરે પહોંચી ગયા, કારણ કે વિશ્વના બીજા ક્રમના સૌથી મોટા ઉત્પાદક ભારતે આગાહી કરી છે કે...
થાઇલેન્ડ: ઉદ્યોગ મંત્રાલય શેરડી બાળવાને રોકવા માટે પગલાં અમલમાં મૂકે છે
બેંગકોક: ઉદ્યોગ મંત્રાલયે, ઉદ્યોગ સમિતિના સહયોગથી, શેરડી બાળવાથી થતા PM 2.5 પ્રદૂષણને ઘટાડવા માટે કડક પગલાં રજૂ કર્યા છે. પ્રદૂષણ ઘટાડવા અને હવાની ગુણવત્તા...