मुजफ्फरनगर : छपरा ग्रामपंचायतीमध्ये उत्तर प्रदेश किसान मजदूर मोर्चाने धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुरकाजी ब्लॉकसह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रत्येकी पाच कार्यकर्त्यांनी एक दिवसाचे उपोषण केले.
पुरकाजी ब्लॉकमधील छापरा गावात सुरू असलेल्या एक दिवसाच्या लाक्षणीक उपोषणावेळी ब्लॉक अध्यक्ष अमित त्यागी म्हणाले, सरदार बी. एम. सिंह यांनी राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. पुरकाजी ब्लॉकमध्ये छपरा, छपार, कासमपूर पठेडी, कुतुबपूर, बरला, ताजपूर आदी गावांत दररोज कार्यकर्ते आंदोलनात भाग घेत आहेत. ऊस दर आणि उसाची थकबाकी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. जर लवकर पैसे मिळाले नाहीत तर धरणे आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल.
गाव अध्यक्ष विनीत कुमार चौधरी म्हणाले, एक मार्चपासून उपोषण जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील सर्व गावांमध्ये सुरू आहे. दररोज प्रत्येक गावात पाच शेतकरी आंदोलनात, उपोषणात सहभाग घेतात. योगी आणि मोदी सरकारच्या धोरणांना विरोध केला जात आहे. सरकारने उसाचा दर ४५० रुपये क्विंटल करावा अशी आमची मागणी आहे.
यावेळी डॉ. कनक सिंह, मोनू गुर्ज्जर, प्रवश कुमार, जयकुमार, सेतू पहलवान आदी उपस्थित होते.