जी-20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या(TIWG) पहिल्या बैठकीचे 28 ते 30 मार्च 2023 दरम्यान मुंबईत होणार आयोजन

भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली टीआयडब्लूजीची पहिली बैठक मुंबईत 28 ते 30 मार्च 2023 रोजी होणार आहे. या तीन दिवसांच्या बैठकीत जी-20 सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी होणाऱ्या विचारविनिमयात सहभागी होतील.

पहिल्या दिवशी मुंबईतल्या ताज लँड्स बॉलरुममध्ये ‘ट्रेड फायनान्स’ हे व्यापार अर्थसहाय्यविषयक चर्चासत्र आयोजित होईल. व्यापाराला आवश्यक अर्थपुरवठ्यामधील तफावत दूर करण्यामध्ये बँका, अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था, विकास अर्थसहाय्य संस्था आणि निर्यात पतसंस्थांची भूमिका आणि व्यापाराला अर्थसाहाय्याच्या उपलब्धतेत डिजिटलायजेशन आणि फिनटेक उपाययोजना कशा प्रकारे सुधारणा करू शकतील याबाबत दोन पॅनलच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. यानंतर 29 मार्च रोजी भारत डायमंड बोर्स च्या मार्गदर्शक टूरचे आयोजन होणार आहे.

29 मार्च 2023 रोजी टीआयडब्लूजी बैठकीचे उद्घाटन वाणीज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते होईल.

त्यानंतर होणाऱ्या दोन सत्रांमध्ये टीआयडब्लूजीच्या व्यापारातून वृद्धी आणि समृद्धी यावर भर देणाऱ्या आणि चिवट जागतिक मूल्य साखळीची उभारणी या प्राधान्यक्रमाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

वृद्धी समावेशक आणि प्रतिरोधक बनवण्यासाठी सामाईक फलनिष्पत्ती साध्य करण्यावर आणि जागतिक मूल्य साखळीला समावेशक विकासासाठी काम करणारी बनवून आणि भविष्यातील धक्के पचवणाऱ्या प्रतिरोधक जागतिक मूल्य साखळीची उभारणी करून विकसनशील देश आणि जागतिक मूल्य साखळीतील जागतिक दक्षिण या गटातील देशांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला जाईल.

समारोपाच्या दिवशी 30 मार्च 2023 रोजी एमएसएमईचे जागतिक व्यापारात एकात्मिकरण आणि व्यापारासाठी प्रभावी लॉजिस्टिक्सची उभारणी या टीआयडब्लूजीच्या प्राधान्यक्रमांवर दोन सत्रांमध्ये चर्चा करण्यात येईल. विकसनशील आणि विकसित या दोन्ही देशांमध्ये उपजीविका टिकवण्यामध्ये असलेले महत्त्व लक्षात घेऊन एमएसएमईंना जागतिक व्यापारात अधिक चांगल्या प्रकारे सामावून घेण्यासाठी यापूर्वीच्या जी-20 अध्यक्षतांनी केलेले कार्य पुढे नेण्याचा विद्यमान अध्यक्षतेचे उद्दिष्ट आहे. सीमेवर आणि दुर्गम आणि पाणथळ जागांमध्ये प्रवासाचा खर्च कमी करणाऱ्या भक्कम लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे मार्ग यावर देखील जी-20 प्रतिनिधी चर्चा करतील.

जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यामध्ये असलेली आव्हाने आणि वसुधैव कुटुंबकम या घोषवाक्याला अनुसरून सध्या अस्तित्वात असलेल्या संधींचा वापर मानवतेच्या फायद्यासाठी कशा प्रकारे करून घेता येईल आणि सामाईक तोडगे शोधता येतील याबाबत सामाईक पद्धतीने विचार करण्याचे भारताच्या अध्यक्षतेचे उद्दिष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here