महराजगंज : सिसवा साखर कारखान्यात चालू गळीत हंगामासाठी गतीने ऊसाचे गाळप सुरू आहे. यादरम्यान साखर कारखान्यामध्ये दहा टन क्षमतेचा एक वजन काटा बसविण्यात आला आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस आयुक्तांच्या निर्देशानंतर साखर कारखान्याच्या गेटवर हा दहा टन क्षमतेचा स्वतंत्र वजन काटा बसविण्यात आला आहे. जर एखाद्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला आपल्या उसाच्या वजनाबाबत शंका असेल तर त्याला आपल्या उस गाडीचे वजन येथेही करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ऊस आयुक्तांनी शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे ऊसाचे वजन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.