देशाच्या निर्यतीला गती, पियूष गोयल यांनी निश्चित केले ४५० अब्ज डॉलरचे लक्ष्य

नवी दिल्ली : देशाच्या निर्यातीने चांगलीच गती घेतली आहे. आता आगामी वर्षात ४५० ते ५०० अब्ज डॉलरची निर्यातीचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे, असे वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.

लाईव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या सहामाहीत १९७ अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली आहे. आतापर्यंत ४८ टक्के उद्दीष्टपूर्ती झाली आहे. यावर्षी ४०० अब्ज डॉलरचे उद्दीष्ट निश्चित करण्यासाठीच्या रोडमॅपवर काम सुरू आहे. इंजिनीअरिंग क्षेत्रातील साहित्याकडून अधिक अपेक्षा आहे. आणि कापड निर्यातीचे उद्दीष्ट १०० अब्ज डॉलरचे असेल, असे ते म्हणाले.

आम्ही ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात, ओमान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोपीय संघ, रशियासह विविध देश आणि बोत्सवाना, लेसोथो, नामिबिया, दक्षिण आफ्रिका यांसह साऊथ आफ्रिका कस्टम युनियन सारख्या (एफटीए) संघटनांच्या स्तरावर मुक्त व्यापार करारांविषयी चर्चा करीत आहोत, असे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here