पुणे : चीनी मंडी
राज्याच्या ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक उद्या (शुक्रवार १८ जानेवारी) मुंबईत होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत महसुली उत्पन्न विभागणीनुसार २०१७ – १८ मधील रखडलेल्या ऊस दर निश्चितीवर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यापूर्वी १७ सप्टेंबर २०१८ ला मंडळाची बैठक झाली होती. पहिल्या ऊस दर नियंत्रण मंडळाची मुदत संपल्यानंतर राज्य सरकारने मंडळावर नव्या सदस्यांची नियुक्ती केली. महाराष्ट्रात २०१७ – १८ मध्ये ९५२ लाख टन गाळप होऊन त्यातून ११.२४ टक्क्यांच्या सरासरीने १०७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. पण, त्या हंगामातील उसाच्या दराची निश्चिती झाली नाही. त्यावर मंडळाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी मंडळाच्या अध्यक्षांसह सर्व सदस्यांनी राजीनामे दिल्याने ऊसदर नियंत्रण बैठकीचा विषय पुन्हा चर्चेला आला. आता यंदाच्या हंगामातील जवळपास ५० टक्के गाळप झाले आहे. तर बैठक २०१७ – १८ मधील ऊस दराविषयी होणार आहे. त्यामुळे बैठकीत कोण कोणते निर्णय होतात याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp