कोल्हापूर : कागल तालुक्यातील केनवडे येथील श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्सने चालू हंगामामध्ये गाळप झालेल्या उसापैकी १६ जानेवारी ते ५ मार्चअखेरच्या उसाला प्रतिटन ३१०१ रुपये दराप्रमाणे १७ कोटी १० लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक, चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी दिली.
चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी सांगितले की, कारखान्याने या हंगामात २ लाख ४ हजार ७४१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून तयार होणाऱ्या केमिकल फ्री गूळ पावडर व सल्फर लेस खांडसरी साखर या आरोग्यदायी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. कारखान्याने गळीत हंगाम २०२३ – २४ मधील ऊस बिले संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत. ‘गोकुळ’चे संचालक अंबरिषसिंह घाटगे, संचालक शिवसिंह घाटगे, राजू भराडे, धनाजी गोधडे, दिनकर पाटील, आनंदा साठे, विश्वास दिंडोर्ले, के. के. पाटील, दत्तोपंत वालावलकर, एम. बी. पाटील आदी उपस्थित होते.