हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर, जून 19 : महाराष्ट्रात गेल्या गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेस अपेक्षित उठाव नसल्याने शेतक-यांच्या उसाचे पैसे देणे कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने साखर उद्योग व शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने सॉफ्ट लोन घेण्यास परवानगी दिली आहे. परंतु, या कर्जाची पुढील हंगामात परतफेड करावी लागणार आहे. राज्यातील साखर उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाने ठोस निर्णय घ्यावेत, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंडलिक साखर कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक यांनी दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र राज्य शासनाकडून प्रती टन खर्चातील तफावत अनुदान म्हणून शासनाकडून मिळावे. त्यादृष्टीने कृषी मूल्य आयोगाकडून अमेंडमेंट करून घ्यावी.
त्यादृष्टीने राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे जरूर तो प्रस्ताव पाठवून सुधारणा सुचविणे आवश्यक असल्याचे ही निवेदनात म्हटले आहे.