इन्कमटॅक्स रिटर्न भरण्यासाठी आज अखेरची संधी, अन्यथा भरा ५००० रुपये दंड

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाकडून इन्कमटॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी आज ३१ जुलै २०२३ ही अंतिम मुदत आहे. म्हणजे तुमच्याकडे फक्त आजचा दिवस यासाठी शिल्लक आहे. जर तुम्ही आयटीआर भरण्यास उशीर केलात तर तुम्हाला १००० रुपये ते ५,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो असे सांगण्यात आले आहे.

याबाबत आजकतने दिलेल्या वृत्तानुसार, आयकर विभागाने देशातील करदात्यांना विविध संदेश आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आवाहन केले आहे. करदात्यांनी आयटीआर भरण्याच्या अंतिम मुदतीची वाट पाहू नये. हे काम लवकर पूर्ण करावे असा सल्ला विभागाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिला जात आहे. रविवारी, आयकर विभागाने आतापर्यंत दाखल केलेल्या आयटीआरचा डेटा शेअर केला आहे.

प्राप्तिकर विभागाच्या आकडेवारीनुसार ३० जुलैपर्यंत देशातील ६ कोटींहून अधिक करदात्यांनी त्यांचे विवरणपत्र भरले आहे. रविवारी २६.७६ लाख करदात्यांनी रिटर्न भरले आहे. जर तुम्ही यापैकी एक नसाल आणि तुम्ही आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी आजच आयटीआर भरावा. इन्कम टॅक्स रिटर्न उशिरा भरल्याबद्दल ५ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना १००० रुपये दंड आकारला जातो. तर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नासाठी ५,००० रुपये विलंब शुल्क आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here