संभल : मुरादाबाद विभागात ऊस पिकावर टॉप बोरर रोगाचा फैलाव झाला आहे. ०२३८ या प्रजातीच्या उसावर हा रोग दिसून आला आहे. शेतकरी या रोगाला आळा घालण्यासाठी विविध रासायनिक औषधांची फवारणी करत आहेत. या रोगाची ही तिसरी पिढी असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी जर पिकाकडे वेळेत लक्ष दिले नाही तर नुकसान होऊ शकते.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संभल जिल्ह्यात ५१ हजार हेक्टरवर ऊस पिक आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी जादा उत्पादन देणारे ०२३८ हे वाण लावले आहे. जून महिन्याच्या अखेरीस या प्रजातीवर किड-रोगाचा हल्ला झाला आहे. याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी डॉ. महावीर सिंह यांनी सांगितले की, पिकाचा रोगग्रस्त भाग कापून काढावा. उसावर कोराजन चारशे लिटर पाण्यामध्ये १५० मिली लिटर मिसळून त्याची फवारणी करावी. त्यानंतर दहा किलो युरिया टाकावा. अशा उपाय योजनेने रोग नियंत्रणात येवू शकतो.