शामली : जिल्ह्यातील ऊस पिकावर टॉप बोरर रोगाचा फैलाव झाला आहे. या रोगावर नियंत्रण मिळवता न आल्यास ऊसाची वाढ खुंटणार आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत हा रोग पसरला आहे. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ कृषी वैज्ञानिक डॉ. विकास कुमार मलिक यांनी सांगितले की, वेळीच यावर उपाय योजना केली नाही, तर ऊसाला मोठा फटका बसू शकतो. ऊसाची रिकव्हरी घटल्यास २० ते ७० टक्के पिकावर परिणाम होईल. सद्यस्थितीत ऊसावर जवळपास ५० टक्क्याहून अधिक टॉप बोरर रोगाचा फैलाव झाला आहे.
या किडीच्या फैलावाबाबत डॉ. विकास कुमार मलिक यांनी सांगितले की, टॉप बोरर किडीचे किटक पांढऱ्या रंगाचे पतंग असतात. यातील मादी पतंग पानाच्या खालच्या पृष्ठभागावर २०० ते २५० अंडी घातले. या समुहातील अंडी पानांच्या मध्यभागी प्रवेश करतो. जुलै ते सप्टेंबर महिन्यात जेव्हा उसाची वाढ होत असते, तेव्हा पानांचा रंग बदलू लागतो. पिकावरील किड लवकर ओळखता येते. यावर उपाययोजना म्हणून ट्रायकोग्रमा जापोनिकम प्रती हेक्टरी जुलै ते ऑगस्ट या कालावधीत पिकावर फवारणी करण्याची गरज आहे. अथवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १० टक्के नुकसान झालेल्या अवस्थेत उसावर क्लोरेंट्रानिलिप्रोलचा १५० मिलीचा डोस ४०० ते ६०० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.