सांगली : वाळवा तालुक्यातील हुतात्मा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी अखेरच्या दिवशी २३ अर्ज दाखल झाले. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एकूण ७२ इतके विक्रमी अर्ज दाखल झाले. त्यामुळे एकतर्फी वाटणारी ‘हुतात्मा’ची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चंद्रशेखर शेळके यांनी वैभव नायकवडी यांच्या हुतात्मा पॅनेलविरोधात जय हनुमान हुतात्मा पॅनेल उभे केले आहे. एक जागा वगळता सर्वच जागी त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. पहिल्या दिवशी ३४, दुसऱ्या दिवशी १५, तर तिसऱ्या दिवशी २३ अर्ज दाखल झाले. खेड गटामध्ये विरोधकांना अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे ही जागा प्रथमदर्शनी बिनविरोध झाली आहे.