देशातील एकूण कोळसा उत्पादनात नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत 11.66 टक्क्यांनी वाढ होत नोव्हेंबर 2022 मध्ये ते 75.87 दशलक्ष टन झाले आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात ते 67.94 दशलक्ष टन होते. कोळसा मंत्रालयाच्या नोव्हेंबर 2022 मधल्या ताज्या आकडेवारीनुसार कोल इंडिया लिमिटेडने (CIL) 12.82% ची वाढ नोंदवली तर सिंगरेनी कोलियरीज कंपनी लिमिटेड (SCCL) तसेच कॅप्टिव्ह माईन्स /इतरांनी अनुक्रमे 7.84% आणि 6.87 % एवढी वाढ नोंदवली आहे.
कोळसा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या सर्वोच्च 37 खाणींपैकी 24 खाणींनी शंभर टक्क्यांहून अधिक तर पाच खाणींनी 80 ते 100% उत्पादन घेतले आहे.
वीज निर्मिती केंद्रांना पाठवण्यात येणाऱ्या कोळशात 3.55 % वाढ होऊन ते नोव्हेंबर 22 मध्ये 62.34 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी ते 60.20 दशलक्ष टन होते.
कोळसा आधारित ऊर्जा निर्मितीने नोव्हेंबर 22 मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 16.28 % वाढ नोंदवली आहे. तर एकूण ऊर्जा निर्मितीत गेल्या वर्षीच्या म्हणजेच नोव्हेंबर 21 च्या तुलनेत 14.63% वाढ झाली आहे.
(Source: PIB)