कोळसा मंत्रालयाने सप्टेंबर 2023 या महिन्यात 67.21 दशलक्ष टन (MT) उत्पादन करून एकंदर कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढीची नोंद केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात झालेल्या 58.04 एमटी उत्पादनाच्या तुलनेत हे उत्पादन 15.81 टक्क्यांनी जास्त आहे. कोल इंडिया लिमिटेड(CIL) चे सप्टेंबर 2023 मधील उत्पादन 51.44 एमटी आहे. गेल्या वर्षी याच महिन्यातील 45.67 एमटी उत्पादनाच्या तुलनेत हे उत्पादन 12.63 टक्क्यांनी जास्त आहे. 2023-24 या वर्षात सप्टेंबर 2023 पर्यंतचे एकूण कोळसा उत्पादन भरीव वाढीसह 428.25 एमटी झाले असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 382.16 एमटीच्या तुलनेत ते 12.06 टक्क्यांनी जास्त आहे.
त्याशिवाय कोळशाच्या चढ-उतारात सप्टेंबर 2023 मध्ये उल्लेखनीय वाढ झाली असून तिचे प्रमाण 70.33 एमटी आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील 61.10 एमटीच्या तुलनेत 15.12 टक्के वाढीची नोंद झाली आहे. कोल इंडिया लिमिटेड(CIL) नेही या मध्ये उल्लेखनीय वाढीची नोंद केली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये हे प्रमाण 55.06 एमटी असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 48.91 एमटीच्या तुलनेत ते 12.57 टक्क्यांनी जास्त आहे. उत्पादन, चढ-उतार आणि साठ्याच्या पातळीत उल्लेखनीय वाढ झाल्याने कोळसा क्षेत्रात अभूतपूर्व चढता कल दिसून येत आहे. या असामान्य प्रगतीमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या कोळसा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांच्या समर्पित कामगिरीमुळे ही अभूतपूर्व वृद्धी दिसून आली आहे. देशाचा सातत्याने होणारा विकास आणि भरभराट यामध्ये योगदान देणाऱ्या एका विश्वासार्ह आणि प्रतिरोधक्षम ऊर्जा क्षेत्रासाठी विनाखंड पुरवठा सुनिश्चित करून कोळशाचे उत्पादन आणि पाठवणी यामध्ये सातत्य राखण्यासाठी कोळसा मंत्रालय वचनबद्ध आहे.
(Source: PIB)