प्रचंड नफा कमावल्यानंतर, TotalEnergies कडून गौतम अदानींच्या अदानी ग्रीन एनर्जीमधील हिस्सा घटविण्याची शक्यता

जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जीने आपल्या शेअरधारकांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. कंपनीने केळ देशातीलच नव्हे तर परदेशातील कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. यामध्ये टोटल एनर्जीजचा समावेश आहे. आता टोटल एनर्जीज कंपनीने आपल्या एकूण हिश्श्यापैकी काही प्रमाणात हिस्सा घटविण्याची तयारी केली आहे. टोटल एनर्जीजने अदानी ग्रीन एनर्जीमध्ये २ अब्ज डॉलर गुंतवणूक करून अदानी ग्रीन एनर्जीमध्ये २० टक्के हिस्सा खरेदी केला होता. कंपनीच्या गुंतवणुकीचे मूल्य २ अब्ज डॉलरवरून वाढून ऑगस्ट अखेरीस १० अब्ज डॉलर झाले आहे. आता कंपनीने प्रॉफिट बुक करण्याचा निर्णय घेतला आहे.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार कंपनी अदानी ग्रीनमधील आपला हिस्सा घटविणार आहे. मात्र, टोटल एनर्जी अदानी ग्रीनमध्ये आपली गुंतवणूक कायम ठेवेल. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेवेळी २४ मार्च रोजी शेअर १२८ रुपयांवर ट्रेड करीत होता. तेथून हा शेअर ३०५० वर गेला. सध्या हा शेअर २०६९ वर ट्रेड करीत आहे. म्हणजेच ३० महिन्यात अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरने १५ पटीपेक्षा अधिक, १५०० टक्के रिटर्न दिला आहे. अदानी ग्रीन एनर्जीने २०२२ मध्ये गुंतवणूकधारकांना ५४ टक्के रिटर्न दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here