इस्लामाबाद : ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने (टीसीपी) एका निविदेतून १,००,००० टन साखर खरेदी केली आहे. गेल्या आठवड्यात ही निविदा बंद झाली होती. आता ही साखर खलीज शुगर्सकडून (एकेएस) $५२६.८० डॉलर प्रती टन दराने खरेदी करण्यात आली आहे. टीसीपीने मागविलेल्या निविदांमध्ये ही सर्वात कमी दराची निविदा दाखल झाली होती.
पाकिस्तान सरकारने २०२० मध्ये साखरेची कमतरता भरुन काढण्यासाठी आणि स्थानिक स्तरावरील साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी साखर आयातीस मंजुरी दिली होती. त्यानंतर ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने गेल्या महिन्यात साखर खरेदीसाठी एका पाठोपाठ एक निविदा प्रसिद्ध केल्या होत्या.
पाकिस्तानमध्ये सध्या साखर उद्योग वादात सापडला आहे. देशात साखरेची टंचाई ही एक मोठी समस्या बनली आहे. याशिवाय साखर उद्योगावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link