भागलपूर : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश कायदा तथा ऊस मंत्री प्रमोद कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रमोद कुमार यांनी सर्किट हाऊसवर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी शेतकऱ्यांना सेंद्रीय ऊसाचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, त्यांना शेती क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना त्यांनी केली. सरकार उसाचे उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी मंत्र्यांनी स्पष्ट केले.
याबाबत लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, बैठकीस जिल्हा विकास आयुक्त प्रतिभा राणी, जिल्हा कृषी पदाधिकारी के. के. झा यांसह गृहबांधणी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. न्यायालयाच्या परिसरात एका अतिरिक्त कार्यालयाच्या निर्मितीबाबत त्यांनी माहिती घेतली. ३.७६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या भवनच्या निर्मितीची प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण केली जाईल. त्यानंतर त्याच्या उभारणीचे काम सुरू केले जाणार आहे. व्यवहार न्यायालयाच्या परिसरातील या कामासाठी तिसऱ्यांचा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.