पाटणा : सीतामढी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बंद पडलेल्या रिगा कारखान्याच्या तुलनेत इतर कारखान्यांना ऊस पाठविण्यासाठी दिले जाणारे वाहतूक अनुदान चालू हंगाम ऑक्टोबर २०२१- सप्टेंबर २०२२ मध्येही सुरू राहणार असल्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी केली.
ऊस उद्योग विभागाच्या बैठकीत आढावा घेताना अध्यक्षस्थानी असलेल्या नितीशकुमार यांनी अधिकाऱ्यांना गेल्या वर्षीप्रमाणे वाहतूक अनुदान सुरू ठेवण्याची सूचना केली. सीतामढी जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना आपला ऊस इतर कारखान्यांना पाठविताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत अशी सूचना त्यांनी केली. बिहारमध्ये एकूण ११ साखर कारखान्यापैकी रिगा आणि सस्मुसा हे दोन कारखाने बंद आहेत.
ऊस उद्योग मंत्री प्रमोद कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, सीतामढीतील ऊस उत्पादकांना वाहतूक अनुदान देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यांच्या जवळ असलेल्या रीगा कारखान्याच्या प्रशासनाने कामगारांशी असलेल्या वादातून कारखाना सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी राज्य सरकारने शेजारील जिल्ह्यात आपला ऊस वाहून नेण्यासाठी अतिरिक्त वाहतूक अनुदान देण्यास सांगितले आहे. ऊस विभागाने शेजारील गोपालगंज आणि पूर्व चंपारण्य येथील तीन कारखान्यांना सीतामढी येथील ऊस खरेदी करण्यास सांगितले आहे. नितीशकुमार यांनी सांगितले की, त्यांची सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वोत्तम बनविण्यासाठी काम करीत आहे. आर्थिक वर्ष २००६-०७ पासून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत