शांघाई : वार्षिक ५,००,००० टन उत्पादनासोबत चीनने सर्वात मोठी कोळशावर आधारित इथेनॉल उत्पादन योजनेची निर्मिती उत्तर-पश्चिम चीनमधील शानक्सी प्रांतातील युलिन शहरात पूर्ण केली. आता त्याची चाचणी सुरू झाली आहे. योजनेमध्ये इथेनॉल आणि इतर रासायनिक वस्तूंच्या उत्पादनांसाठी कच्च्या मालाच्या रुपात कोळशाचा वापर होईल. आणि दरवर्षी १.५ मिलियन टन कोळशाचे यात रुपांतर केले जाईल.
तज्ज्ञांनी सांगितले की, तीन टन धान्यापासून एक टन इथेनॉल उत्पादन करता येते. आणि योजना पूर्ण करणे आणि त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर दरवर्षी १.५ मिलियन टन जैव इथेनॉल कच्चे धान्य वाचवू शकते. ही योजना डायमिथाईल इथरच्या कार्बोनिलेशनच्या माध्यमातून इथेनॉल उत्पादन करते.