केरळमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी स्थापन केली गुळाचे उत्पादन करणारी कंपनी !

इडुक्की : जिल्ह्यातील मरयूर आणि कंथाल्लूर गावातील १५० आदिवासी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गूळ उत्पादन युनिट आणि उत्पादनाची विक्री करण्यासाठी एक कंपनी तयार करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. मरायूर आणि कंथल्लूर ट्रायबल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड मरायूर उडा (गुळाचे गोळे) तयार करेल. हा गूळ सर्वात गोड गुळाच्या प्रकारापैकी एक आहे. मरायुर गुळाचे उत्पादन आणि लागवडीसाठी आदिवासी नियंत्रित शेतकरी सोसायटीची स्थापना करण्याची ही पहिलीच घटना आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आदिवासी शेतकरी व कंपनीचे अध्यक्ष बी. आनंदन यांनी सांगितले की, मरायुर संदल विभागांतर्गत धिंडुकोम्पू, चुरक्कुलम आणि मिशन वायल आदिवासी वसाहतींमधील १५० आदिवासी शेतकऱ्यांना कंपनीत समाविष्ट करण्यात आले आहे. सर्व आदिवासी ऊस उत्पादक शेतकरी स्थानिक विक्रेत्यांना गूळ विक्री करायचे.

अध्यक्ष बी. आनंदन यांनी सांगितले की, मरयुरमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव आणि बाजारपेठ मिळणे हा सर्वात मोठा अडथळा आहे. कंपनीच्या माध्यमातून आम्ही मध्यस्थांना टाळून आमच्या उत्पादनांसाठी रास्त किमती आणि बाजारपेठेतील प्रवेश सुनिश्चित करू असा विश्वास वाटतो. कंपनी आमच्या उत्पादनाची जिऑग्राफिकल इंडिकेशन टॅगसह मरयुर मधुरम या ब्रँड नावाने विक्री करेल. या युनिटमध्ये दररोज १,००० किलो गूळ बनवण्याची क्षमता आहे.

तिरुवनंतपुरममधील सेंटर फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटमधील सहयोगी प्राध्यापक आणि कार्यक्रम समन्वयक पी. जी. अनिल सांगतात की, हा प्रकल्प केरळमधील आदिवासी समुदायांमध्ये पारंपारिक व्यवसायांचे सशक्तीकरण (सहायकिरण) नावाच्या सरकारी उपक्रमाचा एक भाग आहे, ज्याला राज्य अनुसूचित जमाती विकास विभागामार्फत केंद्राने निधी दिला आहे. या उपक्रमामुळे कारखान्यात २५ आदिवासी लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळतो आणि कारखान्यात कच्च्या मालाची कापणी आणि वाहतूक करण्यासाठी अप्रत्यक्षपणे ३०० हून अधिक लोकांना रोजगार मिळतो.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री ओ. आर. केलू शुक्रवारी कंथल्लूरजवळील धिंडुकोम्पू येथे उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करतील आणि ब्रँड लाँच करतील. या उत्पादनांसाठी योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी ते देशभातील आणि परदेशातील स्टोअर्स आणि मॉल्सशी चर्चा केली जात आहेत. योग्य बाजारपेठ आणि रास्त भाव नसल्यामुळे आदिवासी समाजात उसाची लागवड कमी झाली आहे आणि अनेकजण सुपारी लागवडीकडे वळले आहेत.

अनिल यांनी सांगितले की, फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून मरायुरमध्ये ऊस लागवडीचे पुनरुज्जीवन करण्याचे आमचे ध्येय आहे. मरायुर गुळाची लोकप्रियता असूनही, बाजारात अनेक बनावट गूळ या नावाने उपलब्ध आहेत. नेचर से प्युरिटी या टॅगलाइनमध्ये प्रतिबिंबित केल्याप्रमाणे हा उपक्रम मरयुर गुळाच्या नैसर्गिक शुद्धतेवर भर देतो. याचा लाभ संबंधीत शेतकऱ्यांना वाटण्यात येणार असल्याचे अनिल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here