Triumph Motorcycles चे २०२३ पर्यंत फ्लेक्स-फ्युएल इंजिन तंत्रज्ञान करण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली : एक स्थायी, हरित आणि स्वच्छ भविष्यासाठी कंपनी इंजिन तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करीत आहे, अशी घोषणा ब्रिटिश मोटरसायकल ब्रँड ट्रायम्फ मोटरसायकलने घोषणा केली आहे. हे इंजिन टिकवून इंधन स्त्रोतांसाठी अनुकूल राहील. कंपनीने २०२४ मध्ये E४० सोबत इंजिन सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ट्रायम्फ मोटरसायकल (Triumph Motorcycles) या योजनेवर डोर्ना (Dorna) सोबत भागिदारीत काम करीत आहे. त्यातून E४० ईंधन सह Moto2TM जागतिक चैम्पियनशिप मोटरसायकल विकसित केली जावू शकेल. त्याचे वितरण २०२४ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यांनी २०२७ पर्यंत ई १०० सह मोटारसायकल वितरीत करण्याच्या दृष्टीने उद्दिष्ट विकसित करण्यासाठीची तयारीही केली आहे.

E४० म्हणजे ४० टक्के इथेनॉल आणि ६० टक्के इंधन मिश्रण असेल. दुसरीकडे E१०० फ्लेक्स ईंधन वाहन १०० टक्के इथेनॉल इंधनावर चालू शकेल. Triumph Motorcycles रेसिंगसाठी अशा मोटारसायकल विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्या पर्यावरणाला अनुकूल असतील, रेस ट्रॅकच्या योग्य असण्यासह रायडिंगचा आनंदही घेता येईल. Triumph Moto2TM वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी एकच इंजिन सप्लायर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here