त्रिवेणी इंजीनिअरिंग १२% साखर इथेनॉल उत्पादनाकडे डायव्हर्ट करणार

नवी दिल्ली : भारतातील प्रमुख साखर उत्पादकांपैकी एक असलेल्या त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रिजने आपल्या साखर उत्पादनातील १२ टक्के भाग इथेनॉलमध्ये रुपांतरीत केला जाईल अशी घोषणा केली आहे. CNBC-TV१८ सोबत चर्चा करताना त्रिवेणी इंजीनिअरिंग अँड इंडस्ट्रीजचे व्हाइस चेअरमन आणि एमडी, तरुण साहनी यांनी सांगितले की, यावर्षी ४.५ मिलियन टन साखर इथेनॉल कार्यक्रमाकडे वळविण्याची तयारी आहे. आणि आम्ही जवळपास १२ टक्के साखर इथेनॉलकडे डायव्ह्ट करीत आहोत. त्यांनी कंपनीची इथेनॉल क्षमता ६६० किलो लिटर प्रती दिनवरुन वाढवून १,१०० किलो लिटर प्रतिदिन करण्याच्या योजनेबाबत माहिती दिली.

ते म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत कंपनी आपले इथेनॉल उत्पादन १८ कोटी लिटरवरुन वाढवून ३१ कोटी लिटपर्यंत पोहोचविण्याची तयारी करीत आहे. साहनी यांनी असेही सांगितले की, साखर उद्योग पूर्णपणे ४.५ मिलियन टन साखर इथेनॉलकडे वळविण्याची अपेक्षा करू शकतो. इथेनॉल उत्पादन क्षमता विस्तारासाठी त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रिजच्या संचालक मंडळाने दोन नव्या योजनांसाठी ४६० कोटी रुपयांच्या कॅपेक्सला मंजुरी दिली आहे. या गुंतवणुकीने कंपनीला इथेनॉल व्यवसायातील आपला महसूल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट गाठण्यास मदत मिळाली आहे.

इथेनॉलवर कंपनीच्या फोकसनंतरही साहनी यांनी स्पष्ट केले की, संचालक मंडळाने त्यांच्या इंजिनीअरिंग व्यवसायाला वेगळे करण्याबाबत विचार केलेला नाही. याऐवजी कंपनी इथेनॉल उद्योगात आपल्या उपस्थितीच्या विस्तारासाठी कटिबद्ध आहे. इथेनॉल उत्पादनातील वाढ केवळ उद्योगासाठी नव्हे तर पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे.

साहनी म्हणाले की, किमतीमधील वाढ जागतिक साखर बाजारावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे. कारण भारत जगातील द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. साखरेचा जगातील सर्वात मोठा ग्राहकही आहे. किमतींमधील वाढीमुळे इतर देशांकडून आयातीमध्येही वाढ होऊ शकते. खास करुन जे भारताकडील साखर आयातीवर अवलंबून आहेत. त्रिवेणी इंजीनिअरिंग अँड इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या आठवड्यात ३.१२ टक्के आणि गेल्या एक महिन्यात ०.९८ टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here