नवी दिल्ली : केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या २०२२-२३ या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे १२ टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. आणि यासाठी सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) इथेनॉल उत्पादनासाठी तांदूळ पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकार इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचलत आहे. इंधन वितरण कंपन्या (OMCs) उद्योगातील अनेक घटकांकडून मोठ्या प्रमाणावर इथेनॉल खरेदी करीत आहेत. FCI द्वारे डिस्टिलरीजना अनुदानीत तांदूळ पुरवठा बंद केल्यानंतर खराब धान्यापासून इथेनॉलच्या किमतीत दोनदा दरवाढ केली आहे.
Zee Business मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ओएमसींकडून इथेनॉल दरात वाढ करण्याच्या नव्या उपाय योजनेवर बोलताना बीसीएल इंडस्ट्रिजचे (BCL Industries) कार्यकारी संचालक राजिंदर मित्तल म्हणाले की, डिस्टिलरीजना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इथेनॉल मिश्रणाचा वेग कायम ठेवण्यासाठी दरवाढ आवश्यक होती. एफसीआयने अनुदानित तांदळाचा पुरवठा बंद केल्यानंतर अनेक डिस्टिलरींनी कामकाज बंद केले होते. यामुळे सरकारने हंगामाच्या मध्येच किमतीत सुधारणा केली. कारण इथेनॉल उत्पादनावर कोणताही परिणाम झाल्यास मिश्रणाचे लक्ष्य कमी होऊ शकते.
मित्तल म्हणाले की बीसीएलचे हे पाऊल इथेनॉल उत्पादकांसाठी उत्साहवर्धक आहे. दरवाढीच्या नव्या उपायाचा फायदा उद्योग क्षेत्रातील खेळाडूंना होईल. बीसीएल ही भारतातील एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ईएनए) आणि इथेनॉलची सर्वात मोठी धान्य-आधारित उत्पादक कंपनी आहे.
अलिकडेच ओएमसींनी खराब धान्य व मक्क्यापासून उत्पादित इथेनॉलवर ३.७१ रुपये प्रती लिटर अतिरिक्त इन्सेंटिव्ह दिला आहे. खराब धान्य आणि मक्क्यावरील इन्सेंटिव्ह अनुक्रमे ८.४६ रुपये प्रती लिटर आणि ९.७२ रुपये प्रती लिटर असेल. यामध्ये ७ ऑगस्टपासून वाढीव इन्सेंटिव्हचा समावेश आहे.
सात ऑगस्ट रोजी ओएमसींनी इथेनॉलच्या खरेदी दरावर ४.७५ रुपये प्रती लिटर वाढवून ६०.२९ रुपये प्रती लिटर केले आहे. मक्का आधारिक्त इथेनॉलचा दर ६.०१ रुपये प्रती लिटर वाढवून ६२.३६ रुपये प्रती लिटर दर करण्यात आला आहे.