थायलंड : थायलंड शुगर मिलर्स कॉर्पोरेशनकडून शेतकऱ्यांसाठी जादा दराची मागणी

बँकॉक : थायलंड शुगर मिलर्स कॉर्पोरेशनने (TSMC) शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जादा दराने ऊस खरेदी करुन देशांतर्गत साखरेच्या किमतीला चांगला पाठिंबा देण्यासाठी सरकारशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. टीएसएमसीचे अध्यक्ष सिरिवुत सिम्पकदी यांनी सांगितले की ही योजना २०२२-२३ आणि २०२३-२४ या पिक वर्षांसाठी ऊसाच्या विक्रीसाठी लागू असेल. या योजनेत ऊस खरेदी १२०० baht प्रती टन दराने होईल. मात्र, व्यापारी स्तरावरील उसाची गोडी (CCS) १२.६३ टक्के असणे गरजेचे आहे. साखर कारखाने नेहमी १००० baht प्रती टन दराने ऊस खरेदी करतात. त्यामध्ये CCS गोडीचा स्तर १० ते ११ टक्के यादरम्यान असतो.

ही योजना उसाच्या शेतीला प्रोत्साहन देईल. शेतकऱ्यांना ताजा ऊस पुरवठा करण्यासही प्रोत्साहन देईल. ऊस जाळून तोडणी केल्यास वायू प्रदूषण होते. मात्र, शेतकऱ्यांना या पद्धतीत कमी मजुरांची गरज भासते. सिरीवुत यांनी सांगितले की, थायलंडचे साखर कारखाने स्थानिक शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी तयार आहेत. साखर उद्योगाने दुष्काळाचा मारा सहन केला आहे. आता देशांतर्गत आणि विदेशी बाजारात विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. टीएसएमसीला २०२२-२३ मध्ये ऊसाचे उत्पादन ९० मिलियन टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. डिसेंबर २०२१ मध्ये कारखान्यांना शेतकऱ्यांकडून ५०.५५ मिलियन टनूसपोहोचला. त्यामध्ये सीसीएस गोडीचा स्तर १२.३१ टक्के होता. पीक वर्ष २०१७-१८ मध्ये उसाचे उत्पादन १३४.९ मिलियन टन होते. ते २०१९-२० मध्ये ७४.८ मिलियन टन आणि २०२०-२१ मध्ये ६६.६ मिलियन टनावर आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here